मिशन ५०० - कामाची पद्धत व यंत्रणा

पूर्वी एका गावाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीला" पाटील "अशी पदवी होती. म्हणून ५ गावांची जबाबदारी असलेल्या व्यक्तीला डॉ. चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी "पाच पाटील" असे नाव दिले. हे ' पाच पाटिल' आपापल्या पाच गावांचा सर्व्हे करतात आणि त्या गावातील एक गाव प्रमुख निवडून त्याला पाच समन्वयक जोडण्यची जवाबदारी दिली जाते. त्यांनी ३० शेतकऱ्यांचा एक गट तयार करायचा. २०० तासापेक्षा जास्त वेळ कामाची मागणी असेल त्या गावाला पाच-पाटील भेट देतात. या ३० शेतकऱ्यांची ग्राम सभा घेतात. जर शेतकरी पोकलेन मशीनसाठी डिझेलचा खर्च आणि ऑपरेटरसाठी अन्न देण्यास त्यार आहेत तेथे मिशन ५०० च्या कामास सुरवात करण्यात येते.

कामाची पाहणी करून आणि कितपत शेतकऱ्याची खर्चाची खरंच तयारी आहे याचा अंदाज घेतला जातो. खात्री झाली कि GSDA वेबसाईट वरच्या गावनकाशाच्या मदतीने माथा ते पायथा कामाचे नियोजन करून देतात. कुठे? - कसे? काम करायचे असे तांत्रिक मार्गदर्शन करून , पारदर्शकता , नियम , शिस्त याबद्दल माहिती सांगितली जाते. गावाची लोकसंख्या , गुरांची संख्या, पिके, क्षेत्रफळ यावरून जलआराखडा तयार केला जातो. कामाचे अनुक्रमण केले जाते. पोकलेन / जेसीबीचा मशीनसचा लाभ घेण्यासाठी स्वयंसेवी संस्था / सीएसआर निधीसाठी संपर्क साधला जातो. मशीनच्या भाड्यासाठी अर्धा खर्च स्वयंसेवी संस्थांद्वारे दिला जातो आणि उर्वरित अर्धा खर्च म्हणजेच डिझेलसाठीचा खर्च शेतकऱ्यांकडून दिला जातो.

गावात जलसंधारणाचे काम सुरु करण्याची मिशन ५०० ची कार्यपद्धती

1
गावाची नीवड

पाच पाटलांनी गावाची निवड करणे . त्यातील 1 माणूस गाव प्रमुख म्हणून निवडणे- जो वेळ द्यायला तयार आहे आणि ज्याची काम करण्याची इच्छा आहे किंवा गावातील काम करायला आणि वेळ द्यायला तयार असलेला माणूस पाच पाटलांना भेटला तरी गावाची निवड करणे .


गाव प्रमुखाला मिशनची माहिती देणे

अशा गाव प्रमुखाला "मिशन 500 गाव प्रमुख " ग्रुप ला जोडणे . यात रोजच्या रोज चालू असलेल्या कामाबद्दल माहिती त्यांना मिळते. त्यातून मी एकटा कसे करू (inhibition) हि भावना कमी होते . सामान्य शेतकरी सहज काम करतात हे बघून आत्मविश्वास वाढतो. "डिझेल टाका मशीन वापरा" या पद्धतीने त्यास नालाखोलीकरण, गाळ काढणे, शेतरस्ते तयार करणे हि कामे करायची आहेत हे व्यवस्थित समजते .

2

3
कामाची माहिती घेणे

गाव प्रमुखाने गावात 5 ग्राम समन्वयक जोडणे त्यांना मिशन 500 कोटी लिटर जलसाठा या मोहिमे बद्दल, जलसंधारणाबद्दल माहिती सांगणे - त्या समन्वयकाने त्यांच्या शेताची, शिवाराची जबाबदारी घ्यायची, म्हणजेच प्रत्येकी 5 शेतकरी कामासाठी तयार करावे.


जनजाग्रुती

गावाचा WhatsApp ग्रुप बनवणे. यात कमीत कमी 30 शेतकरी आणि पाच पाटील यांना जोडणे. हे "पाच पाटील" शेतकऱ्यांसाठी माहितीचे व्हीडिओ, फोटो, माहिती पुस्तिका वगैरे ग्रूपवर टाकतात. गावात ग्रामसबा, कार्यशाळा, किर्तन या माध्यमांतुन गावकर्यांचे मनसंधारण केले जाते. या जनजागृतीतून काम करण्याबाबत मानसिक तयारी होत असते.

4

5
कामाची तांत्रीक माहिती

यादी तयार करणे- ज्यांची डिझेल चा खर्च करण्याची तयारी आहे अशा शेतकऱ्यांची यादी तयार करायची . यात नाव , गट नं , मोबाईल नं , अंदाजे मागणी तास , पोकलेन/JCB , कामाचे स्वरूप - खोलीकरण , गाळ काढणे , शेतरस्ते इत्यादि माहिती असते .


कामाचे नियोजन व मागणी पत्र

ज्या गावात 30 शेतकरी काम करायला तयार होतात , 200 तासापेक्षा जास्त वेळ कामाची मागणी येते त्या गावाला पाच-पाटील भेट देतात . कामाची पाहणी करून आणि कितपत शेतकऱ्याची खर्चाची खरंच तयारी आहे याचा अंदाज घेतला जातो. खात्री झाली कि GSDA वेबसाईट वरच्या गावनकाशाच्या मदतीने माथा ते पायथा कामाचे नियोजन करून देतात. कुठे - कसे काम करायचे असे तांत्रिक मार्गदर्शन करून, पारदर्शकता, नियम, शिस्त याबद्दल माहिती सांगितली जाते. गावाची लोकसंख्या, गुरांची संख्या, पिके, क्षेत्रफळ यावरून जलआराखडा तयार केला जातो. गावाकडून/ ग्राम पंचायतीकडून मशीन च्या मागणीसाठी(स्वयं सेवी संघटना) NGO च्या नावाने पत्र घेटले जाते .

6

7
कामाची सुरवात

मागणीनुसार (स्वयं सेवी संघटना)NGO कडून मशीन मिळते आणि कामाला सुरुवात होते .


कामाचे मोजमाप

कामाचे मोजमाप- रोज होणारे काम , शेतकऱ्याचे नाव , कामाचे तास , खर्च , कामापूर्वीचे Geotag फोटो , कामानंतरचे फोटो , कामाचे मोजमाप हि माहिती WhatsApp ग्रुप वर टाकणे आवश्यक आहे त्याच प्रमाणे रजिस्टर मध्ये लिहणे हे देखील कामाचाच भाग आहे.

8

9
शिफारसपत्र

काम पूर्ण झाल्यानंतर एकूण कामाचे तास , शेतकरी , शेतरस्त्यांची लांबी , शेतकऱ्यांनी डिझेलसाठी केलेला एकूण खर्च इत्यादींची माहिती देऊन मशीन मालकाला भाड्यापोटी उरलेली रक्कम देण्याचे शिफारस गावातर्फे (स्वयं सेवी संघटना)NGO ला करण्यात येते . यात मशीन मालकाचे नाव , बँक डिटेल्स इ. महिती असते .

या जलक्रांतीत सहभागी व्हा

आपल्या गावात-जिल्हयात-राज्यात मिशन ५०० कोटी लि. अंतर्गत उपक्रम राबविण्यास इच्छीत असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा.