मिशन ५०० चा प्रवास - २०१७ ते २०२२
१४ कोटी लिटरचा जलसाठा
लोकसहभागातून जलसंधारणाची हि संकल्पना अस्तित्वात आली. प्रायोगीक तत्वावर चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव या गावात हि संकलपना राबवण्यात आली. पहिल्याच वर्षी१४ कोटी लिटरचा जलसाठा तयार केले गेला.
२० कोटी लिटरचा जलसाठा
२०१८ मध्ये आणखी ६ गावांमध्ये प्रायोगीक तत्वावर या संकल्पनेची चाचणी घेण्यात आली. शेतकरी या कामासाठी एकत्र येवुन काम करू शकतात की नाही हे पाहण्यासाठी ग्रामसभा घेतल्या गेल्या. शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि २० कोटी लिटरचा जलसाठा या वर्षी तयार करण्यात आला.
१०२ कोटी लिटर जलसाठा क्षमता
या प्रकल्पाच्या इतर गावांपर्यंत विस्तार करण्यासाठी प्रशिक्षित नेतृत्वाची आवश्यकता होती. २०१९-२० मध्ये १४ लोकांना "लँडमार्क फोरम" च्या धर्तीवर ९ महिन्यांसाठी प्रशिक्षण दिले गेले. त्यांनी प्रत्येकी ५ गावांची जबाबदारी घेतली, म्हणून त्यांना "पाच पाटील" असे संबोधले जाते. कोणताही मोबदला न घेता ते काम करतात. १६ गावांमध्ये कामाचा विस्तार करण्यात आला. जलसाठा क्षमता १.०२ अब्ज लिटरपर्यंत पोहोचली.
२०८ कोटी लिटर जलसाठा
मिशन ५०० ची संकल्पना महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांतील ४ तहसीलमधील ३४ गावांपर्यंत पोहोचला आणि २०२०-२१ मध्ये २.०८ अब्ज लिटरची जलसाठा क्षमता ओलांडली. प्रकल्पाला आर्थीक पाठिंबा दर्शविणारा स्वयंसेवी संस्थांची संख्या ४ वर पोहचली - सकाळ रिलीफ फंड, रोटरी क्लब, भारतीय जैन संघटना आणि नाम फाउंडेशन.
४५० कोटी लिटर जलसाठा
२०२१-२२ मध्ये, या मॉडेलची ७ जिल्ह्यांमधील ७० गावांमध्ये नक्कल केली गेली आणि एकुण ४५० कोटी लिटर जलसाठा तयार केला गेला. मिशन तितूर नदी स्वच्छता- २०२१ साली पावसाळ्यात चाळीसगाव शहरात ८ वेळा पूर आला. स्वयंसेवी संस्था/सीएसआर आणि लोकसहभागाच्या माध्यमातून शहरातील नदीच्या ७ कि.मी. अंतरावरील १५०० डंपर गाळ काढण्यात आला.