आमच्या विष्यी

आमच्या विषयी

वैश्विक उष्णता वाढ बघता सर्वच ठिकाणी भुजलसाठा कमी झालेला दिसतो आहे. पाण्याचा एक थेंब जमिनीत खोल वर मुरण्यासाठी सरासरी 50 वर्षांचा कालावधी लागतो,आणि हा पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर आहे .मानवाच्या हव्यासा मुळे,निसर्गाच्या लहरी पणामुळे आणि वैश्विक उष्णता वाढीमुळे शेती साठी आणि घरगुती वापरासाठी पाण्याची कमतरता आताशी मोठ्याप्रमाणात समाजाला जाणवू लागली आहे .पाण्याअभावी होणारे हाल बघून त्यावर काही करता येईल का? किंव्हा या अडचणीवर काहि तोडगा काढता येईल का अशा विवंचनेत असताना डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण (IRS) यांनी 2017 मध्ये चाळीसगाव तालुक्यातील काही जाणंकारांशी चर्चा करून धामणगाव गावातून एक चळवळ सुरू केली. त्या चळवळीतून हजारो हात राबले, शेतशिवार फुलले. ती चळवळ म्हणजे ‘मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा’.

आमच्या विषयी
‎


या चळवळीत शेतकऱ्यांनी मुख्यत्वे जलसंधारण, वृक्षारोपण या विषयावर काम करण्यासाठी एकत्र यावे आणि कामकाजाची जबाबदारी स्वीकारून काम करावे, अशी संकल्पना तयार झाली. चौदा लोकांनी प्रत्येकी पाच गावांची जवाबदारी घेतली, त्यांना "पाच पाटील" नाव पडले. या पाच पाटलांनी नेत्रुत्वगुण प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होवून कामाचे सूक्ष्म नियोजन, शेतकऱ्यांचा सहभाग आणि चळवळीला साथ देणाऱ्या सामाजिक संस्थांची मदत घेऊन या कामाचे प्रारुप त्यार केले. नाले खोलीकरण, नदीचे पुनरुज्जीवन, फुटलेल्या बांधाची दुरुस्ती, धरणातील गाळ काढण्यासह रस्त्यांची दुरुस्तीची कामेही या चळवळीतून केली जातात.
‘बहुजन हिताय, बहुजय सुखाय, लोकानुकंपाय’ अशा पद्धतीने लोकांना एक सामाजिक व्यासपीठ या चळवळीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जात आहे. या सर्व कामांनी ‘सहकार्यातून समृद्धीकडे’ वाटचाल करता येते, हे स्वअनुभवाने आणि आत्मविश्वासाने लोकांना पटवून दिले.

जलक्रांतीचा ध्यास

Icon for आमचे ध्येय

आमचे ध्येय

१) लोकसहभागातून विकेंद्रीत पाणी व्यवस्थापन प्रणालीचा विकास

२) म्रुद- जलसंधारणातुंन शाश्वत शेती, पर्यावरणीय समतोल आणि ग्राम समृद्धी

Icon for आमची उद्दिष्टे

आमची उद्दिष्टे

१) चाळिसगाव तालुक्यात ५00 कोटी लिटर पाण्याचा जलसाठा तयार करणे.

२) महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात ५00 कोटी लिटर पाण्याचा जलसाठा तयार करणे.

३) भूजल पातळी वाढविणे.

४) गावातील नद्यांचे पुनरुज्जीवन करणे.

५) खरिपासह रब्बीच्या हंगामासाठी पाण्याची मुबलकता उपलब्ध करून देणे.

६) शेतकऱ्यांचे पीक आणि उत्पन्न वाढवणे.

७) पर्यावरणाचा समतोल राखणे.

मिशन ५०० कोटी लि. जलसाठा - अंतर्गत केली जाणारी कामे

नाला खोलीकरण, गाळमुक्त बंधारे

शोष खड्डे (Soak Pits)

शेत रस्ते

आमची टिम

वारकरी संप्रदायाप्रमाणे कोणत्याही मानधनाशिवाय, लोभाशिवाय चालणारी "मिशन ५००" ही एक लोकचळवळ आहे. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक चळवळींपैकी एक आहे. लाखोंच्या संख्येने दरवर्षी निघणारी वारी हे एक आश्चर्य आहे. या ठिकाणी आयोजक, संयोजक कोणी नसतो. कोणी नेता नसतो, ना कोणी कार्यकर्ता. सगळे समान. धर्म, जात, लिंग, वंश असा कोणताच भेद नसतो. स्वयंप्रेरणेने लोक एकत्र येतात. वाजत, गाजत, नाचत दिंड्या काढतात. गावोगावी कीर्तन करतात, लोकजागृती करतात. यात पैसा लागत नाही आणि भ्रष्टाचारही होऊ शकत नाही. तशाच पद्धतीने 'पाण्याची वारी' चाळीसगावच्या गावागावात नेण्याचे काम आमच्या टीमने केले. मानपान, प्रतिष्ठा, सत्कार, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे हे विषय टळुन, लोकांमध्ये मिसळून, जमिनीवर लोकांसोबत खाली बसून प्रबोधन केले. लोकांमध्ये स्वतः काम करण्याचा विश्वास निर्माण करुन निर्णय आणि नियोजन प्रक्रीयेसह काम सुपु्र्द केले.

ह्या बद्दल वाचा
आमची टिम

योगदानकर्ते

मिशनच्या कामात शेतकर्यांना आर्थीक बळ देणारया सामाजिक संस्था ‍‍

सर

सकाळ रिलीफ फंड

रक

रोटरी क्लब ओफ चेंबुर

भज

भारतीय जैन संघटना

Naam Foundation

नफ

नाम फाउंडेशन

या जलक्रांतीत सहभागी व्हा

अधिक माहितीसाठी व सहभागी होण्यासाठी व आपल्या गावात-जिल्हयात-राज्यात मिशन ५०० कोटी लि. अंतर्गत उपक्रम राबविण्यास इच्छीत असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा.