पाच पाटील टीम

पाच पाटील टीम

गावाचा विकास करायचा असेल तर कुणाला तरी पुढाकार हा घ्यावाच लागतो.पूर्वी एका गावाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीला 'पाटील' अशी पदवी होती.तो व्यक्ती गावाच्या विकासाचा सर्वंकष विचार करीत असे आणि कामाची अंमलबजावणी करीत असे.अशाच प्रकारे ५ गावांची जबाबदारी असलेल्या व्यक्तीला डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'पाच-पाटील' असे नाव देण्याचे ठरविले. यासाठी सुरुवातीला ११ लोक तयार झाले, त्यात श्री.तुषार निकम, श्री.शेखर निंबाळकर, साै.सविता राजपूत, श्री.पंकज पवार, श्री.एकनाथ माळतकर , साै.आरस्ता माळतकर, श्री.हेमंत मालपुरे, श्री.शशांक अहिरे, प्रा. श्री.आर. एम. पाटील, श्री.सचिन राणे, श्री.सोमनाथ माळी हे ते जलयोद्धे होते. या सर्व जलयोद्ध्यांना प्रत्येकी ५ गावांची जबाबदारी देण्यात आली. कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांचे 'व्यक्तिमत्त्व विकसन आणि नेतृत्त्वगुण विकसन' करून देण्यात येत होते. ही यंत्रणा तालुक्यासाठी उभी करून देणे हेच नेतृत्वगुण विकसन होते. याचा वापर कोणीही करावा, अशी मुभा चळवळीत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी दिली होती.

जो कोणी देणगीदार, संस्था, गावाला पोकलेन मशीन उपलब्ध करून देईल, त्याने त्याचे नाव पेपरमध्ये द्यावे, जाहिरात करावी, श्रेय घ्यावे, त्याला कुणाचीही काहीही हरकत नव्हती. जलयोद्धे यंत्रणा तयार करून देतील, कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी करून देतील. पोकलेनसाठी प्रतितास साधारण दोन हजार रुपये खर्च येतो. त्यासाठी मशीन भाडे म्हणून देणगीदाराने प्रतितास हजार रुपये द्यावेत आणि शेतक-यांनी डिझेलचा खर्च म्हणून प्रतितास हजार रुपये द्यावेत, ड्रायव्हरच्या त्या दिवसाच्या जेवणाची व्यवस्था करावी, अशी ही योजना होती. यामध्ये 'पाच-पाटील',गावप्रमुख यांना कोणतेही मानधन किंवा पगार देण्यात येणार नव्हता. त्यांच्या कोणाच्याही हातात पैसे द्यायचे नव्हते. देणगीदारांनी पोकलेनचे भाडे मशीन मालकाला परस्पर चेकने द्यायचे आणि शेतकऱ्यांनी डिझेलचे पैसे पेट्रोल पंप चालकाला द्यायचे, असा आराखडा होता. त्यामुळे त्यात संपूर्ण पारदर्शकता होती. ठरवूनही कुणाला भ्रष्टाचार करता येणे शक्य नव्हते. महत्त्वाचे म्हणजे जलयोद्ध्यांनी स्वतःची कोणतीही संस्था स्थापन केली नव्हती. वारकरी संप्रदायाप्रमाणे कोणत्याही 'पदाशिवाय, आधाराशिवाय चालणारी चळवळ', अशी ही रचना होती.

‎

वारकरी संप्रदाया कडुन मिळालेली प्रेरणा


वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक चळवळींपैकी एक आहे. लाखोंच्या संख्येने दरवर्षी निघणारी वारी हे एक आश्चर्य आहे. याठिकाणी आयोजक, संयोजक कोणी नसतो. कोणी नेता नसतो, ना कोणी कार्यकर्ता.सगळे समान. धर्म, जात, लिंग, वंश असा कोणताच भेद नसतो. स्वयंप्रेरणेने लोक एकत्र येतात. वाजत, गाजत, नाचत दिंड्या काढतात. गावोगावी कीर्तन करतात, लोकजागृती करतात. यात पैसा लागत नाही आणि भ्रष्टाचारही होऊ शकत नाही. तशाच पद्धतीने 'पाण्याची वारी' चाळीसगावच्या गावागावात नेण्याचे काम 'पाच-पाटलांनी केले. कोणत्याच गावात, कोणत्याच सभेत मानपान, प्रतिष्ठा, व्यासपीठ, सत्कार, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे हा विषय घेतला नाही. लोकांमध्ये मिसळून, जमिनीवर लोकांसोबत खाली बसून प्रबोधन केले, पाणीप्रश्नाची जाणीव करून दिली. ज्याला काम करायची इच्छा होती त्या प्रत्येकाला कोणताच भेदभाव न करता कामात सहभागी करून घेतले. एकही रुपयाचा मोबदला, मानधन घेतले नाही. उलटप्रसंगी पदरमोड करून कार्यक्रम घडवून आणले. या सर्व कामांमुळे तालुक्यातील लोकांना हे पाण्याचे वारकरी आवडणे साहजिकच होते.

दुसऱ्या टप्प्याच्या या तीन महिन्यांत 'पाच-पाटलां'नी खूप मेहनत घेतली. लोक काय म्हणतील, याचा संकोच न बाळगता, गावोगाव, गल्लोगल्ली जाऊन सभा घेतल्या. लोकांना पाण्याचे महत्त्व सांगितले. कामाची पद्धत समजावून दिली. शंका-कुशंका दूर केल्या. टीकेच्या भडिमाराला 'पाच-पाटील' बळी पडले नाहीत. १६ गावांमध्ये ३० शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले होते. ज्या गावांमध्ये कमी शेतकरी तयार होते, तिथे मशीन पाठविणे व्यवहार्य नव्हते. ते पुढच्या काळात घेऊ असे ठरले.वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक चळवळींपैकी एक आहे. लाखोंच्या संख्येने दरवर्षी निघणारी वारी हे एक आश्चर्य आहे. याठिकाणी आयोजक, संयोजक कोणी नसतो. कोणी नेता नसतो, ना कोणी कार्यकर्ता.सगळे समान. धर्म, जात, लिंग, वंश असा कोणताच भेद नसतो. स्वयंप्रेरणेने लोक एकत्र येतात. वाजत, गाजत, नाचत दिंड्या काढतात. गावोगावी कीर्तन करतात, लोकजागृती करतात. यात पैसा लागत नाही आणि भ्रष्टाचारही होऊ शकत नाही. तशाच पद्धतीने 'पाण्याची वारी' चाळीसगावच्या गावागावात नेण्याचे काम 'पाच-पाटलांनी केले. कोणत्याच गावात, कोणत्याच सभेत मानपान, प्रतिष्ठा, व्यासपीठ, सत्कार, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे हा विषय घेतला नाही. लोकांमध्ये मिसळून, जमिनीवर लोकांसोबत खाली बसून प्रबोधन केले, पाणीप्रश्नाची जाणीव करून दिली. ज्याला काम करायची इच्छा होती त्या प्रत्येकाला कोणताच भेदभाव न करता कामात सहभागी करून घेतले. एकही रुपयाचा मोबदला, मानधन घेतले नाही. उलटप्रसंगी पदरमोड करून कार्यक्रम घडवून आणले. या सर्व कामांमुळे तालुक्यातील लोकांना हे पाण्याचे वारकरी आवडणे साहजिकच होते. दुसऱ्या टप्प्याच्या या तीन महिन्यांत 'पाच-पाटलां'नी खूप मेहनत घेतली. लोक काय म्हणतील, याचा संकोच न बाळगता, गावोगाव, गल्लोगल्ली जाऊन सभा घेतल्या. लोकांना पाण्याचे महत्त्व सांगितले. कामाची पद्धत समजावून दिली. शंका-कुशंका दूर केल्या. टीकेच्या भडिमाराला 'पाच-पाटील' बळी पडले नाहीत. १६ गावांमध्ये ३० शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले होते. ज्या गावांमध्ये कमी शेतकरी तयार होते, तिथे मशीन पाठविणे व्यवहार्य नव्हते. ते पुढच्या काळात घेऊ असे ठरले.

पाच पाटील टीमची थोडक्यात ओळख

जल संवर्धनाच्या चळवळीतीले ज्वलंत जलयोद्धे

मा.श्री. तुषार बबनराव निकम

पाच पाटील
शिक्षण - M. A. M. Ed
व्यावसाय - शिक्षक
गावांची जबाबदारी - धामणगाव, तळेगाव, पातोंडे, बोरखेडा (पिराचे)
एकूण जलसाठा - ४० कोटी लि. च्या वर जलसाठा

मा. श्री. शेखर नारायण निंबाळकर

पाच पाटील
शिक्षण - बीएसस्सी बी .एड ( फिजी )
व्यावसाय - उपशिक्षक
गावांची जबाबदारी - रांजणगाव,सांगवी ,बाणगाव ,प्रिपी ता पाचोरा,प्रिपी ता पाचोरा,कानडगाव ता खुल्ताबाद.
एकूण जलसाठा - ३४ कोटी लि. च्या वर जलसाठा

मा. श्री. प्रशांत प्रकाशराव गायकवाड

पाच पाटील
शिक्षण - बीएसस्सी बी .एड ( फिजी )
व्यावसाय - उपशिक्षक , रा. स . शि प्र.मंडळ लि. चाळीसगाव
गावांची जबाबदारी - हिरापूर ,तळेगाव ,हातगाव,रोहिणी,पिंळगाव,राजदेहरे ,सेटमेंट,शिंदी
एकूण जलसाठा - ६२ कोटी लि. च्या वर जलसाठा

मा. श्री. पंकज बालाजी पवार

पाच पाटील
व्यावसाय - पत्रकार, फोटोग्राफर,शेतकरी
गावांची जबाबदारी - धामणगाव,पळासरे, खडकी सिम, दहिवद, लोंढे

प्रा.श्री. आर. एम.पाटील

पाच पाटील
शिक्षण -
व्यावसाय - प्राध्यापक
गावांची जबाबदारी - दसेगाव दड पिंपरी, चिंचखेडे ,देवळी, राम्हने , दोण पिंपरी

मा. श्रीमती. सविता सत्यवान राजपूत

पाच पाटील
व्यावसाय - उपशिक्षिका
गावांची जबाबदारी - वरखेड बूद्रुक, पथराड

मा. श्री. एकनाथ मोतीलाल माळतकर

पाच पाटील
व्यावसाय - प्राथमिक शिक्षक
जामदा, शिदवाडी,बोरावहीर( धुळे),ताडे( एरंडोल),नांद्राकोळी(बुलढाणा),झाडगाव( यवतमाळ),सायगव्हाण,वडगाव जाधव,नागदतांडा,सोनवाडी,बेलखेडा, उप्पलखेडा .

मा. सौ. आरस्ता एकनाथ माळतकर

पाच पाटील
गावांची जबाबदारी - जामदा,दस्केबर्डी,भऊर

मा.श्री.प्रा किरण मुरलीधर पाटील

पाच पाटील
व्यावसाय - शिक्षक
गावांची जबाबदारी - तळोदे दिगर,देवळी,गोरख पूर तांडा,शिवापूर

मा.श्री.डॉ.संदीप राठोड

पाच पाटील
व्यावसाय - डॉक्टर
गावांची जबाबदारी - लोणजे, आंबेहोळ, कोकडी तांडा, वडगाव आंबे, शिव तांडा

मा. श्री. मिलिंद जिजाबराव देवकर

पाच पाटील
शिक्षण -M. A. मराठी (संतांचे वांग्मय) ,B. P. Ed.
गावांची जबाबदारी - पळासरे, तिरपोळे, जुवार्डी, ता. भडगांव, चांदसर, ता. धरणगाव,
एकूण जलसाठा - २४ कोटी लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा पूर्ण झाला

मा. श्री श्रीकांत ज्ञानदेव पायगव्हाणे

पाच पाटील
शिक्षण - Diploma (Civil Engineering), B.E.(Civil)
व्यावसाय - सहाय्यक अभियंता (बृहन्मुंबई महानगरपालिका)
एनजीओ आणि सीएसआर कंपन्यांशी समन्वय साधणे. प्रशिक्षण मॉड्यूल्सचा विकास करणे.
जबाबदारी - मराठवाड्यात मिशन च्या कामाचे समन्वय करणे.

मा.श्री.संजय पोटे

पाच पाटील
व्यावसाय - राष्ट्रीय महाविद्यालय चाळीसगाय येथे कॉम्पूटर विभागात प्राध्यापक
गावांची जबाबदारी - बोढरे
एकूण जलसाठा - ४० कोटी लि. च्या वर जलसाठा

मा.श्री.दिनेश राजाराम जाधव

पाच पाटील
गावांची जबाबदारी - हातले, जावळे, चाभार्डी.
एकूण जलसाठा - साधारण 10 ते 11 कोटी लिटर जलसाठा झाला आहे

मा. श्री. सुशांतराव मारुतीराव भिलारे

पाच पाटील
गावांची जबाबदारी -ओखवाडी, म्हाटे खुर्द, डांगरेघर, मोहट, मामुर्डी, बिभवी, केडंबे, वाघदरे, गावडी
एकूण जलसाठा - १२ कोटी लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा पूर्ण झाला

मा.श्री.जितेंद्र परदेशी

पाच पाटील
गावांची जबाबदारी - बोढर्रे ,सांगवी,बानगांव,तलोंदे प्रचार, पाथरजे

मा.श्री.अभिजीत पवार

पाच पाटील
शिक्षण - M.A(Politics & History ) B.Ed, D.T.Ed
व्यावसाय - स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
गावांची जबाबदारी - दडपिंप्री

मा.श्री.प्रा.मनोहर दत्तात्रय देशमूख

पाच पाटील
गावांची जबाबदारी - तळोदे दिगर, देवळी,गोरख पूर तांडा, शिवापूर
एकूण जलसाठा - साधारण २५ कोटी लिटर जलसाठा झाला आहे

या जलक्रांतीत सहभागी व्हा

अधीक माहितीसाठी व या जलक्रांतीत सहभागी होण्यासाठी किंवा आपल्या गावात-जिल्हयात-राज्यात मिशन ५०० कोटी लि. अंतर्गत उपक्रम राबविण्यास इच्छीत असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा.