Mission 500 - जलक्रांतीची गोष्ट !

प्रशासकीय अधिकारी सेवेत राहून देशासाठी आणि समाजासाठी योगदान तर देतातच शिवाय समाजात असलेली आपली प्रतिमा , आपले गावकरी , परिसरातील लोक यांना सोबत घेऊन एखादी मोठी लोकोपयोगी चळवळ उभी करता येते . तो घडा घा

 · 5 min read

प्रशासकीय अधिकारी सेवेत राहून देशासाठी आणि समाजासाठी योगदान तर देतातच शिवाय समाजात असलेली आपली प्रतिमा , आपले गावकरी , परिसरातील लोक यांना सोबत घेऊन एखादी मोठी लोकोपयोगी चळवळ उभी करता येते . तो घडा घालून दिला आहे डॉ . उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी , वे भारतीय राजस्व सेवेत ( IRS ) मुंबईत कार्यरत आहेत . मूळचे ते जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे . शिक्षण घेत असताना , पाण्याअभावी होणारी गावाची , तालुक्याची आणि जिल्ह्याची परवड ते पाहात होते . पाण्याअभावी शेती गेली , रोजगारासाठी स्थलांतर झाले , हसती- खेळती गावे ओस पडू लागले . पिण्याच्या पाण्याचे टँकर फिरू लागले , हे त्यांनी स्वतः पाहिले , अनुभवले . ही परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी केले पाहिजे . पाण्यासाठी चळवळ उभारली पाहिजे आणि लोकांना सोबत घेऊन पाण्याचा प्रश्न सोडविला पाहिजे , हे त्यांनी मनाशी निश्चित केले होते . त्यातूनच ' मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा ' या संकल्पनेचा जन्म झाला . यातून लोकचळवळ निर्माण झाली . हजारो हात राबले . शेतशिवार फुलले . त्या चळवळीच्या ' अथपासून इति'पर्यंतची ही गोष्ट ...


पा णी चळवळीत डॉ . उज्ज्वलकुमार चव्हाण यांचे हे तिसरे वर्ष होते . पहिल्या वर्षी त्यांनी आपल्या आजोळी म्हणजेच चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथे १४ कोटी लिटर्सचा जलसाठा ' केला होता . दुसऱ्या वर्षी म्हणजे २०१८ १ ९ या वर्षात सहा गावांत जलसंधारणाचे काम पूर्ण केले होते . यात धामणगाव , रांजणगाव , शिदवाडी , कळमूड , वरखेडे आणि कुंझर या गावांचा समावेश होता . तिसऱ्या वर्षी ही चळवळ तालुकाभर नेली . ६२ गावांत जनजागृती करण्यात आली . तालुक्यात ' ५०० कोटी लिटर्स जलसाठा ' करायचा , असे मिशन हाती घेण्यात आले . १६ गावांत भर उन्हाळ्यात काम झाले . एकूण ' १०२ कोटी लिटर्स जलसाठा ' निर्माण करण्यात आला . २०१८-१९ साली चाळीसगाव तालुक्यात पानि फाउंडेशनची कामे झाली होती . डॉ . चव्हाण यांच्या माध्यमातून सहा गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात आली . या सगळ्या कामांचा अनुभव मांडण्यासाठी जून २०१ ९ मध्ये चाळीसगाव येथे ' पाण्याचे चर्चासत्र ' आयोजित करण्यात आले होते . त्यात १५ गावांतील ४० ते ५० जलयोद्धे सहभागी झाले होते . यावेळी अनुभव कथनातून असे लक्षात आले की , गावागावात पाण्याचे काम करण्यासाठी लोक इच्छुक आहेत ; पण या लोकांचे संघटन करणे , कामाचे नियोजन करणे , मशीन देऊ शकणाऱ्या दात्यांशी संपर्क साधने आदी कामांची जबाबदारी घेऊ शकतील , असे नेतृत्वक्षम लोकांची आवश्यकता आहे . एका दिशेने चालणारे , एका ध्येयाने पछाडलेले


लोक तयार करणे गरजेचे आहे . ' व्यक्तिमत्त्व विकसन आणि नेतृत्त्वगुण विकसन ' यासाठी ' लँडमार्क फोरम'चा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उपक्रम डॉ . चव्हाण यांनी केला होता . अगदी तसाच उपक्रम पाण्यासाठी राबवायचे ठरविले . यात सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये काम करण्याची इच्छा ' आणि ' वेळ देण्याची तयारी ' हे दोनच निकष लावण्यात आले . या उपक्रमासाठी कोणताही मोबदला मिळणार नव्हता . घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे , असे हे सुरुवातीला वाटले असेल . यासाठी ११ लोक तयार झाले . तुषार निकम , शेखर निंबाळकर , सविता राजपूत , पंकज पवार , एकनाथ माळतकर , आरस्ता माळतकर , हेमंत मालपुरे , शशांक अहिरे , आर . एम . पाटील , सचिन राणे , सोमनाथ माळी हे ते जलयोद्धे होते . दर पंधरा दिवसांनी शनिवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत या सर्वांची कार्यशाळा चालायची आणि रविवारी त्यावर काम करायचे असायचे . या जलयोद्ध्यांना प्रत्येकी ५ गावांची जबाबदारी देण्यात आली होती . पर्वी एका गावाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीला



लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ

एकत्र येऊन आपण काम करू शकतो आणि सगळ्यांचाच फायदा करून घेऊ शकतो , याचा अनुभव सामान्य शेतकरी आपल्या शब्दांत मांडत आहे . एक नक्षन व्यासपीठ जे याआधी शेतकऱ्यांना उपलब्ध नव्हते , ते अशा अनेक शेतकऱ्यांना उपलब्ध झाले आहे . लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ ,

असे स्वरूप या ' पाणी चळवळी ला प्राप्त झाले आहे . एकत्र येऊन आपण आपला पाणीप्रश्न सोडवू शकतो तर स्वच्छता , आरोग्य , शिक्षण असे अनेक प्रश्नही सोडवू शकतो . ही भावना निर्माण होणे आणि तसा आत्मविश्वास तयार होणे , हेच या चळवळीचे महत्त्वाचे फलित असेल ..


' पाटील ' अशी पदवी होती . म्हणून ५ गावांची जबाबदारी असलेल्या व्यक्तीला डॉ . चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ' पाच - पाटील ' असे नाव दिले . चळवळीचे बीजारोपण सप्टेंबर २०१ ९ ते मे २०२० हा कामाचा कालावधी ठरविण्यात आला . यात पहिले तीन महिने म्हणजे सप्टेंबर , ऑक्टोबर आणि नोव्हेंबर स्वतःवरच काम करायचे होते . यामध्ये प्रत्येकाने स्वतःची दिनचर्या लिहिणे , त्यातून फावला वेळ कमी करणे , स्वतःची अपूर्ण कामे शोधणे , लिहून काढणे आणि ती महिनाभरात पूर्ण करणे , स्वतःच्या उणिवा आणि शक्तिस्थाने शोधणे , त्यासाठी आपल्या निकटवर्तीयांच्या मुलाखती घेणे , नातेसंबंधातील तणाव दूर करणे आणि त्याबद्दल स्वतः पूर्ण आणि स्थिर होणे , असे या प्रशिक्षणाचे स्वरूप होते . नेतृत्वासाठी तयार होण्यासाठी स्वतःच्या भावनांशी ओळख करायची होती . त्यात भीती कशाची वाटते , अपयशानंतर काय भावना निर्माण होते , यशाची गुरुकिल्ली काय , द्वेष- राग कशाचा येतो , हे बघायचे होते . आपला शब्द म्हणजे आपले अस्तित्व असते , याची प्रकर्षाने जाणीव सहभागी जलयोद्ध्यांना करून देण्यात आली . आपण आपला शब्द पाळला नाही , तर लोकांचा आपल्यावरचा विश्वास कमी होतो . विश्वास संपादन करणे आणि तो टिकविणे म्हणजे नेतृत्व होय . जर शब्द तुटला


तर त्याचा आपल्यावर आणि इतरांवर काय परिणाम होतो , त्याची भरपाई कशी करणार ? अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी पुढे काय काळजी घेणार , याची माहिती कार्यशाळेत जाहीर सांगायची असायची . जे सध्याच्या वर्तमानात अस्तित्वात नाही , ते भविष्य आपण आपल्या शब्दांतून उभे करतो . त्यासाठी आपले शब्द प्रभावी आणि विश्वासार्ह बनविणे , ही त्यासाठीची पूर्वतयारी होती . या तीन महिन्यांत ' मास्टरी ओव्हर सेल्फ ' मिळविण्याकडे प्रवास झालाच आणि सोबतच सर्वांची गटबांधणी पक्की झाली . हा गट आपल्या हितासाठी आणि प्रगतीसाठी आहे , ही भावना रुजली . एका शनिवारी चाळीसगावला अशीच कार्यशाळा नियोजित होती ; पण डॉ . चव्हाणांच्या सख्ख्या मेहुण्यांना कॅन्सरमुळे नाशिकला ICU मध्ये अॅडमिट केले होते . ताईजवळ राहायचे की आपण कार्यशाळेसाठी दिलेला शब्द पाळायचा असा प्रश्न तयार झाला . त्याही परिस्थितीत डॉ . चव्हाणांनी ठरल्याप्रमाणे कार्यशाळा घेतली आणि संध्याकाळी परत नाशिकला गेले . दोन दिवसानंतर मेहुण्यांचे निधन झाले . या घटनेमुळे सर्व ' पाच - पाटलांची ' या मिशनबद्दलची निष्ठा खूप पक्की झाली . हेमंत मालपुरे यांनी स्वतः ची आई वारल्याचं दुःख बाजूला ठेवून १४ व्या दिवशी वाघळी गावामध्ये खोलीकरणाचे काम सुरू केले . आपण दिलेल्या शब्दांप्रती बांधिलकी पाहून गावातले लोक जोडले जाणे स्वाभाविक होते .